शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019 (10:44 IST)

डाव्या विद्यार्थी संघटनेकडून बाबुल सुप्रियो यांना धक्काबुक्की

पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठात पर्यावरण राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांना डाव्या आघाडीच्या विद्यार्थी संघटनेच्या एका गटाकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. या घटनेनंतर विद्यापीठ परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण तयार झाले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
अभाविपने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहाण्यासाठी बाबूल सुप्रियो विद्यापीठात गेले होते.
 
सुप्रियो विद्यापीठात दाखल होताच स्टुंडट फेडरेशन ऑफ इंडिया आणि आर्ट फॅकल्टी स्टुडंटस् युनियनच्या सदस्यांनी त्यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी सुरू केली आणि नंतर सुप्रियो यांना घेरून धक्काबुक्की सुरू केली. त्यानंतर राज्यपाल जगदीप धनकड यांनाही विद्यार्थ्यांनी विरोध केला.