संबंधित माहिती
- RJ मलिष्काला जेव्हा मुंबईच्या खड्ड्यांमध्ये चंद्र दिसतो
- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज घोषित होणार तारखा
- देवेंद्र फडणवीस यांच्या '5 वर्षांत भ्रष्टाचाराचा आरोप नाही' या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?
- उद्धव ठाकरे: विधानसभा निवडणूक 2019 आधी कदाचित मी आयोध्येला जाणार
- निर्मला सीतारामण : अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकारचा नवा डोस, भारतीय कंपन्यांना करात सवलत
बजरंग पुनियानला जागतिक कुस्ती स्पर्धेत तिसऱ्यांदा पदक
भारताचा अव्वल पैलवान बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे. बजरंगनं 65 किलो गटात कांस्यपदकाच्या लढतीत मंगोलियाच्या तुलगा तुमूर ओशीरवर 8-7 अशा फरकाने सनसनाटी विजय मिळवला आहे.
जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेतलं बजरंगचं हे आजवरचं तिसरं पदक ठरलं आहे. त्यामुळे जागतिक कुस्तीची तीन पदकं मिळवणारा तो भारताचा पहिलाच पैलवान ठरला आहे. याआधी 2013 आणि 2018 साली बजरंगनं या स्पर्धेत पदक मिळवलं होतं.