शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019 (16:35 IST)

उद्धव ठाकरे: विधानसभा निवडणूक 2019 आधी कदाचित मी आयोध्येला जाणार

विधानसभा निवडणुकांआधी कदाचित मी आयोध्येला जाईन, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराबाबत सतत बोलणाऱ्या लोकांवर टीका केली होती, त्या संदर्भात पत्रकारांनी विचारल्यावर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
 
"मी वक्तव्य नाही करत, तर मी हिंदूंच्या भावना बोलून दाखवत आहे. न्यायालयावर माझा विश्वास आहे. शक्य झालं तर विधानसभा निवडणुकांच्या आधी मी आयोध्येला जाईल, पण मी ते आताच जाहीर करत नाही, पण मी अजून नक्की ठरवलेलं नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
 
"कोर्टाच्या निकालाकडे आपण लक्ष लावून आहोत. जर कोर्टाकडून हा प्रश्न सुटत नसेल तर सरकारने धाडस करावं, असं मी म्हटलं होतं. पण कोर्टाकडून न्याय मिळतोच आणि त्यासाठी थांबण्याची विनंती जर माननीय पंतप्रधानांनी केली असेल तर त्यांची विनंती रास्तच आहे," असंही पुढे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
 
'2 दिवसांमध्ये युतीबाबत समजेल'
"गेले काही दिवस युती हा विषय गाजतोय. लोकसभा निवडणुकीच्या आधी आम्हा तिघांमध्ये युतीचा फॉर्म्युला ठरला आहे, वेगळी पद्धत यावेळी अवलंबली आहे. मुख्यमंत्र्यांनीच शिवसेनेची यादी जाहीर करावी. हे उपहासात्मक नाही. युतीत कुठलीही खळखळ नाही. दोन दिवसांत समजेल सर्व काही," असं उद्धव यांनी युतीबाबत सांगितलंय.
 
"विकास कामाबद्दल विरोध नाही, आरे कारशेडला विरोध करण्याचं एक कारण आहे नाणारबाबतही तसंच आहे. नाणारबद्दल असं मत बदलायला लागलं तरं सरकारवरचा विश्वास उडेल," असं उद्धव ठाकरेंनी नाणार आणि आरेबद्दल बोलताना म्हटलं आहे. हे वाचलंत का?