शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019 (10:29 IST)

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 175 जागा जिंकेल - अजित पवार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या 175 जागा निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केलाय.
 
"मुख्यमंत्री सातत्यानं 'आम्हाला विरोधक दिसतच नाहीत' असं सांगतायत. जर विरोधक मैदानात नाहीत, तर राज्यात इतक्या सभा का घेतायत? केंद्रातून मंत्री कशासाठी येतायत? मोदी, शाह कुणासाठी सभा घेतायत? निवडणुकीआधी यात्रा का काढावी लागली," असे सवालही अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून विचारले.
 
दुसरीकडे, शरद पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील नेतृत्त्वावर महत्त्वाचं विधान केलंय. पवार म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाही पद्धतीने राजकीय वारसदार ठरेल."