गुरूवार, 23 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 18 मे 2020 (13:53 IST)

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृतदेह बस स्टँडवर आढळला

Corona Ahmedabad
गेल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह अहमदाबादेत एका बस स्टँडवर सापडल्याने खळबळ उडाली.
 
या 67 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी (15 मे) अहमदाबादमधल्या दानिलिम्डा बस स्टँडवर आढळल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. या मृतदेहाची ओळख पटल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
 
मृताच्या कुटुंबीयांनी रुग्णालय आणि पोलिसांनी योग्य वेळेत यासंबंधीची माहिती दिली नाही, असा आरोप केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी आरोग्य खात्याचे माजी मुख्य सचिव जेपी गुप्ता यांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.