1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 17 मार्च 2021 (20:40 IST)

देवेंद्र फडणवीस: 'सचिन वाझेंना पाठीशी घालणाऱ्या राजकीय बॉसेसचा शोध घ्यायला हवा'

'सचिन वाझे यांच्यावरुन राज्याचं वातावरण तापलं आहे. केवळ परमबीर सिंह यांची बदली करून चालणार नाही तर सचिन वाझेंच्या पाठीमागे कुणाचा हात आहे याचा शोध घ्यायला हवा अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
 
"परमबीर सिंह, सचिन वाझे ही छोटी माणसं आहेत. यांच्या मागे कोण आहे याचा शोध घ्यायला हवा. सचिन वाझेंना ऑपरेट करणारे लोक सरकारमध्ये आहेत. त्यांचा फैसला कोण करणार? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते दिल्लीत बोलत होते.
 
"मुकेश अंबानी यांच्याघरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली. घटनाक्रम सगळ्यात मोठं मनसुख हिरेन यांची हत्या केली गेली. मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आधी कधी झालेलं नाही.
नव्वदीच्या दशकात गुन्हेगाराचं राजकीयीकरण झालं होतं. रक्षण करणारे अपराधी असतील सुरक्षा कोण करणार? एपीआय सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा का घेण्यात आलं हा प्रश्न आहे," असं फडणवीस म्हणाले.
2004मध्ये वाझे यांना निलंबित करण्यात आलं. 2016मध्ये त्यांनी व्हीआरएस घेतली. मात्र तपास सुरू असल्याने मान्य करण्यात आली.
2018 मध्ये आम्ही सत्तेत असताना वाझे यांना सेवेत घ्यावं असा दबाव होता. अॅडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेतला. लेखी सल्ला नव्हता. वाझे यांच्यावर गंभीर चौकशी. मी त्यांना सेवेत न घेण्याचा निर्णय घेतला. उद्धवजींनी फोनवरून चर्चा केली. त्यांचे प्रमुख मंत्री माझ्याकडे आले होते.
ज्या कारणांसाठी वाझे यांची नियुक्ती करण्यात आली हेही शोधायला हवं.
2008मध्ये सचिन वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. प्रवक्ते म्हणूनही काम केलं. शिवसेनेशी घनिष्ठ संबंध आहेत. शिवसेनेच्या नेत्यांशी व्यापारी हितसंबंध आहेत. त्यांनी कंपन्यांही तयार केल्या. उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यानंतर वाझे यांना सेवेत रुजू करून घेण्यात आलं. कोरोनाच्या बहाण्याने रिव्ह्यू कमिटीने वाझे यांना सेवेत करून घ्यायला मंजुरी दिली. कोरोना काळात अधिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
"वाझे सोडून अन्य कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेत परत घेण्यात आलं नाही. उच्च न्यायालयाने निलंबित केलं असतानाही, खंडणीचं रॅकेट नावावर असलेल्या व्यक्तीला सेवेत करून घेण्यात आलं. वाझे आणि त्यांचे सहकारी सक्रिय होते. खराब रेकॉर्ड असतानाही वाझे यांना सेवेत रुजू करून घेण्यात आलं. क्राईम इंटेलिजन्स युनिट या अतिशय महत्त्वपूर्ण जागी वाझे यांची नियुक्ती करण्यात आली. दोन अधिकाऱ्यांची बदली करून वाझे यांची नियुक्ती करण्यात आली".
मुंबईत हायप्रोफाईल केसेस झाले, कोणाच्याही हद्दीत असो, केस या युनिटकडे येत असे. अंबानी यांच्याघरासमोर स्फोटकांची केस यांच्याकडे जाण्याची आवश्यकता नसे.
मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याबरोबर ते दिसत असत. वसुली अधिकारी म्हणून त्यांना बसवण्यात आलं. मोठ्या प्रमाणावर डान्सबारसाठी सूट देण्यात आली.
घटना घडल्या त्या भयानक आहेत. मनसुख हिरेन यांना वाझे आधीपासून ओळखत होते. स्कॉर्पिओ त्यांनी खरेदी केली होती पण पैसे दिले नव्हते. चार महिने त्यांच्याकडेच होती. नोव्हेंबर ते फेब्रुवारी यांच्याकडेच होती. पैसे द्या अशी हिरेन यांची मागणी.
हिरेन यांच्याकडून गाडी परत मागवण्यात आली. गाडी चोरीला गेली असती तर टॅम्परिंग झालेलं असतं. मनसुखला सांगण्यात आलं की गाडी पार्क करा आणि चावी आम्हाला आणून द्या.
उद्या एक तक्रार दाखल करा की माझी गाडी चोरीला गेली आहे. त्यांची तक्रार करून घेण्यात आली नाही. तपास अधिकाऱ्यांना सचिन वाझेचा फोन आला. हा गुन्हा दाखल केला आणि मला माहिती द्या.
 
शिस्तबद्ध कट
मनसुख यांना वाझेच चौकशी करत होते. त्यांच्या चौकशीनंतर मनसुखला वाझेनेच सांगितलं की तुम्ही तक्रार करा. ओळखीच्या वकिलाकडे घेऊन गेले.
मनसुख यांचं शेवटचं लोकेशन सापडलं जिथे झालेल्या खंडणी रॅकेटमध्ये वाझे यांचं नाव होतं. मनसुख यांना तिथेच मारण्यात आलं. खाडीत मृतदेह फेकण्यात आला. भरती असती तर मृतदेह वाहून गेला असता पण ओहीटी असल्याने मृतदेह रेतीबंदर परिसरात आढळून आला. त्यांचा अंदाज अर्ध्या तासाने चुकला.
फुप्फुसांमध्ये पाणी नाही असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. पाण्यात बुडून मृत्यू झाला तर फुप्फुसात पाणी असणं अपेक्षित आहे. मनसुख यांची हत्या झाली आहे. एटीएसने जशी कारवाई करायला हवी तशी कारवाई झालेली नाही. माझ्यासारख्या पोलीसबाहेरील व्यक्तीला मिळू शकतात तर पोलिसांकडे जास्त पुरावे आहेत. एटीएस, एनआयए यांच्याकडे मनसुखचा आवाज आहे. वाझे यांनी त्यांना काय काय सांगितलं याचा रेकॉर्ड आहे.
एवढे पुरावे असतानाही, मनसुख यांच्या मृत्यूप्रकरणी तपासाला वेग नाही. ही दोन्ही प्रकरणं संलग्न आहेत. एटीएसने कारवाई करण्यात उशीर केला. मनसुख प्रकरणही एनआयएने तपासायला हवं.
आमचा एटीएसवर अविश्वास नाही. त्यांच्यावर दबाव आहे का? हे सगळं सचिन वाझे एकट्याने करू शकत नाही. त्यांच्याबरोबर आणखी कोण कोण आहे याचा विचार करायला हवा.
पोलिसांचं अपयश नाही. हे सरकारचं अपयश आहे. सरकारने वादग्रस्त भूतकाळ असलेल्या व्यक्तीला महत्त्वाच्या पदी बसवलं. सरकारचा हा नाईलाज आहे. मुख्यमंत्री त्यांचा बचाव करत होते. विधिमंडळात त्यांचा बचाव करत होते. सचिन वाझे यांना महात्मा ठरवलं जात होतं. सचिन वाझे ओसामा बिन लादेन आहेत का असंही विचारण्यात आलं.
मुंबईतल्या बेटिंग रॅकेटशी सचिन वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलणी होत होती. नितेश राणे यांनी विचार करूनच आरोप केले होते.