कांद्यापाठोपाठ खाद्यतेलही महागलं
केंद्र सरकारने पामतेलाच्या आयातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे देशातील सर्व खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या आहेत. सोयाबीनची मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत असल्यामुळेही दर वाढत आहेत.
भारतात खाद्य तेलाच्या एकूण मागणीपैकी 60 टक्के तेल आयात केलं जातं. त्यात निम्मं प्रमाण पाम तेलाचं असतं. पामतेल महागलं की त्याचा इतर तेलांच्या दरावही परिणाम होतो. सूर्यफुलाच्या तेलाचे दर आता 105 ते 125 रुपये प्रतिलिटर झाले आहेत तर शेंगदाण्याचे तेल 125 ते 175 प्रतिलिटर झालं आहे.