शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019 (13:19 IST)

देशातीली मूलभूत उद्योगांच्या उत्पादनात 5.2 टक्क्यांनी घसरण

देशातील आठ मूलभूत उद्योगांमधल्या उत्पादनात 5.2 टक्क्यांनी घसरण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
 
सप्टेंबर महिन्यात देशातील आठपैकी सात उद्योगांच्या उत्पादनात कमालीची घट पाहायला मिळाली. कोळशाच्या उत्पादनात 20.5 टक्के, कच्च्या तेलामध्ये 5.4 टक्के आणि नैसर्गिक वायूमध्ये 4.9 टक्के घट झाली. रिफायनरी उत्पादनामध्ये - 6.7 टक्के, सिमेंट - 2.1 टक्के, स्टील - 0.3 टक्के तर वीजेच्या उत्पादनात - 3.7 टक्के इतकी तफावत आढळून आली आहे.
 
फक्त खतांच्या उत्पादनामध्ये सप्टेंबर महिन्यात 5.4 टक्क्यांची वाढ दिसून आल्याचं आकडेवारीमध्ये समोर आलं आहे.