सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019 (13:14 IST)

अंडी खाल्ल्यास मुलं नरभक्षक बनतील - भाजप नेते गोपाल भार्गव

मध्य प्रदेशमधले भाजपचे नेते गोपाल भार्गव यांनी राज्य सरकारच्या अंगणवाडीच्या मुलांना अंडी देण्याच्या योजनेवर प्रतिक्रिया नोंदवताना अजब वक्तव्य केलं आहे.
 
अंडी खाल्ल्यास मुलं नरभक्षक होतील, असं वक्तव्य भार्गव यांनी केल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. ही बातमी द टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.
 
"सनातन संस्कृतीमध्ये मांसाहारी जेवण निषिद्ध मानलेलं आहे. आपण जबरदस्तीने कुणालाच खाऊ घालू शकत नाही. लहानपणापासूनच त्यांना हे शिकवल्यास मोठे होऊन ते मांस तर खातीलच, नरभक्षकही बनतील," असं अंडी योजनेवर प्रतिक्रिया देताना भार्गव म्हणाले.