मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : बुधवार, 25 सप्टेंबर 2019 (16:36 IST)

संघासाठी प्रत्येक भारतीय हिंदूच : मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी प्रत्येक भारतीय हिंदूच असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. जम्मू-काश्मिरला विशेष अधिकार देणारं कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचंही त्यांनी समर्थन केलं आहे.  
 
आंतरराष्ट्रीय पत्रकारांशी मोहन भागवत यांनी मंगळवारी (24 सप्टेंबर) संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर संघाची भूमिका स्पष्ट केली.
 
लोकांना हद्दपार करण्यासाठी नाही तर भारतीय नागरिक नाहीत अशा लोकांची ओळख पटवण्यासाठी एनआरसी आणण्यात आला असल्याचंही भागवत यांनी सांगितलं.
 
50 परदेशी संस्थांमधील 80 पत्रकार या परिषदेला उपस्थित होते. या पत्रकार परिषदेला संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी हे सुद्धा उपस्थित होते.