गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019 (11:25 IST)

PoK बाबत सरकारनं निर्णय घ्यावा, सैन्य तयार आहे - लष्करप्रमुख बिपिन रावत

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं होतं की "कलम 370 हटवलं. आता आमचं पुढचं उद्दिष्ट आहे पाकव्याप्त काश्मीर भारतात घेणं." त्यांच्या या विधानावर लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
"PoK बाबत निर्णय घेण्याचं काम सरकारचं आहे. अशा कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सैन्य नेहमी तयार असतं," असं वक्तव्य भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केलं आहे.  
 
कलम 370 हटवल्यानंतर भारत प्रशासित काश्मीरच्या परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले, "काश्मीरच्या लोकांना हे कळायला हवं की, हे जे काही होत आहे ते त्यांच्या भल्यासाठीच होत आहे. हे कलम हटवल्यानंतर काश्मीर आता संपूर्ण देशाशी जोडला गेला आहे. याचा अनुभव आता इथल्या लोकांनाही येईल."

"जम्मू आणि काश्मीरच्या लोकांनी 30 वर्षं दहशतवादाचा सामना केला. त्यानंतर आता जेव्हा आपल्याकडे शांतता असते, तेव्हा व्यवस्था कशी असते, हे अनुभवण्याची संधी त्यांना मिळाली आहे,"असंही त्यांनी म्हटलं.