शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 (13:55 IST)

कर्तारपूर मार्गिकेचे उद्घाटन 9 नोव्हेंबरला

कर्तारपूर मार्गिकेचे उद्घाटन 9 नोव्हेंबर होणार असून शीख भाविकांसाठी ती खुली केली जाईल, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी (20 ऑक्टोबर) सांगितलं.
 
ही मार्गिका पाकिस्तानातील कर्तारपूरच्या दरबार साहिब या धार्मिक ठिकाणाला पंजाबमधील गुरुदासपूर डेरा बाबा नानक या धर्मस्थळाशी जोडणार आहे.  
 
पाकिस्तानातील कर्तारपूरच्या दरबार साहिब येथे व्हिसा नसतानाही भेट देण्याची भेट देण्याची सुविधा शीख भाविकांना उपलब्ध झाली आहे. कर्तारपूर या स्थानाची स्थापना 1522 साली गुरु नानक देव यांनी केली होती. गुरु नानक देव यांच्या 550 व्या जयंतीच्या निमित्तानं 9 नोव्हेंबर रोजी ही मार्गिका सुरू होईल.
 
हा जगातील सर्वात मोठा गुरुद्वारा असून त्याला भारतासह जगातील शीख भाविक भेट देऊ शकतील असं इम्रान यांनी ट्वीट केलं आहे.