बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 (13:13 IST)

'कुठलंही बटण दाबा, मत कमळालाच'

महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. हरयाणातील एका भाजपा उमेदवाराने EVMचं कोणतंही बटण दाबा, मत कमळालाच जाणार आहे असं खळबळजनक विधान केलं आहे.
 
असांध विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बख्शीशसिंह याचां एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मतदारसंघातील एका सभेच्या भाषणावेळी बख्शीशसिंग यांनी EVM सेट केल्याचं सूचवलं आहे. तुम्हीही कुठलंही बटन दाबा, मत कमळाचा पडणार असा दावा विर्क यांनी केला आहे.
 
जर तुम्ही आज चूक केली, तर त्याची सजा तुम्हाला 5 वर्षे भोगावी लागेल. कोणी कुठं मतदान केलं, याची आम्हाला माहिती मिळेलच. जर तुम्ही म्हणाल तर तेही सांगू. मोदी आणि मनोहरलाल यांच्या नजरा तीक्ष्ण असून तुम्ही कुठेही मत द्या, ते जाणार तर कमळालाच. तुम्ही कुठलेही बटन दाबा, मत तर कमळाच पडणार, आम्ही मशिन सेट केल्या आहेत, असे खळबळजनक विधान विर्क यांनी केलं आहे.