सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

मतदार यादीत तुमचं नाव आहे, हे तुम्ही कसं चेक कराल? : विधानसभा निवडणूक

निवडणुकीच्या काळात सर्वांत महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक असतो तो म्हणजे मतदार. पण मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे कसं पाहाता येईल किंवा नसेल तर मतदार यादीत नाव नोंदणी कशी कराल?
 
राज्यात आज विधानसभेसाठी मतदान होत आहे.
 
मतदार यादीत नाव शोधणे
तुम्हाला वाटू शकतं गेल्या निवडणुकीच्या वेळी मतदार यादीत नाव नोंदणी झाली तेव्हा तुमचं नाव होतं मग यावेळी करायची गरज आहे की नाही? तर त्याचं उत्तर असं आहे की दरवेळी निवडणूक आयोगाकडून आपल्या याद्या अद्ययावत केल्या जातात.
 
बऱ्याचदा मतदार यादीतून नाव गाळलं जाऊ शकतं. त्यामुळे आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे तपासून पाहावं. केंद्रीय निवडणूक आयोग मतदारांची यादी National voters service portal या मतदार यादीमध्ये देत असतं. या मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही ते या लिंकवर क्लिक करून पाहा.
 
मतदार नोंदणी
जर तुमचं नाव या यादीत नसेल तर फॉर्म 6 भरा.
 
जर पहिल्यांदा मतदान करणार असाल तरी फॉर्म 6 भरावा लागतो. तसेच मतदार संघ बदलायचा असेल तर फॉर्म 6 भरावा लागतो.
 
मतदार यादीत नाव नोंदणी 2019 : फॉर्मसोबत तीन कागदपत्रं आवश्यक
1. रंगीत फोटो
 
2. वयाचा पुरावा जसं की 10 वीची सनद
 
3. तुमचा पत्ता असलेला पुरावा जसं की रेशन कार्ड, टेलिफोन-इलेक्ट्रिसिटी बिल, पासपोर्ट, लायसन्स किंवा आधारकार्ड
 
मतदार यादीत नाव नोंदणी ऑनलाइन करता येते
फॉर्म 6 ऑनलाइन भरायची सुविधा नसेल तर फॉर्म 6 भरून आपल्या मतदारसंघाच्या Electoral Registration Officer कडे द्यावा. तुमचं नाव यादीत येईल. फॉर्म 6 ऑनलाइन भरता येतो. त्याच ठिकाणी आपल्या कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड करता येता. नंतर ते सबमिट करता येतं.
 
ऑनलाइन मतदार नोंदणी शक्य नसलास...
जर इंटरनेटचं स्पीड कमी आहे किंवा काही कारणामुळे जर कागदपत्रं जोडता आली नाहीत तर फॉर्मच्या प्रिंटआउट काढून घ्याव्यात आणि त्या भरून, फोटो लावून आपल्या भागातील Voters Registration Centre किंवा Election Registrar Office मध्ये जाऊन तो फॉर्म भरावा. यानंतर तुमच्या घरी बूथ लेव्हल ऑफिसर येईल आणि पडताळणी करून पाहील.
 
नंतर तुम्हाला अप्लिकेशन आयडी मिळेल. पुढच्या वापरासाठी हा आयडी कामाला येईल. तुम्हाला पत्राद्वारे किंवा एस. एम. एस. द्वारे माहिती दिली जाईल.
 
नवीन मतदार नाव नोंदणी
जर तुम्ही भारतीय नागरिक आहात आणि 1 जानेवारी 2019 रोजी तुमचं वय 18 वर्षं पूर्ण झालं असेल तर तुम्ही नाव नोंदणी करू शकता. ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्याच मतदार क्षेत्रात नाव नोंदणी करा. एका पेक्षा जास्त जागी मतदार नोंदणी करता येत नाही.
 
मतदार यादीमध्ये नाव दुरुस्ती
जर तुमचं नाव यादीमध्ये आहे पण ते चुकलं असेल तर फॉर्म 8 भरून रजिस्ट्रेशन करता येतं. जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलात आणि तुम्हाला तुमचं नाव तिथं नोंदवायचं असेल तर फॉर्म 6 भरावा लागतो.
 
जर कुणाच्या नावावर तुमची हरकत असेल तर फॉर्म 7 भरावा लागतो.
 
मतदान ओळखपत्र हरवलं असेल तर काय कराल?
जर तुमचं ओळखपत्र हरवलं असेल तर 25 रुपये भरून आणि पोलीसांकडे केलेल्या तक्रारीची पोचपावती जोडून election registrar office मध्ये नेऊन जमा करावा.
 
तुमच्या भागातला ऑफिसर कोण आहे हे कसं समजेल?
ही माहिती तुम्हाला व्होटर नॅशनल पोर्टलवर मिळू शकते.
 
व्होटर आयडी 2 महिन्यांच्या आत मिळतं. त्यामुळे निवडणुकीच्या दोन महिने आधी व्होटर आयडी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू करा. व्होटर आयडी मिळालं नाही पण तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे तर तुम्ही तुमच्या पोलिंग बूथवर मतदान करू शकता.