गुरूवार, 9 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑक्टोबर 2019 (11:27 IST)

आज प्रचाराचा शेवटचा दिवस

Today is the last day of the campaign
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशी राज्यात विविध राजकीय पक्षांनी अनेक ठिकाणी प्रचारसभांचं आयोजन करण्यात आलं आहे. अमित शाह यांची सकाळी खानदेशात तर दुपाकी अकोले, कर्जत-जामखेड येथे सभा होणार आहे.
 
राज ठाकरे यांची ठाण्यात सकाळी 10 वाजता तर त्याचवेळी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड-शो होईल. आगित्य ठाकरे यांची मुंबईत बाईक रॅलीही आज आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार त्यांच्या प्रचाराची सांगता बारामतीमध्ये करतील तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साताऱ्यात दहिवडी येथे सभा घेतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मालाडमध्ये असतील तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.