रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑक्टोबर 2019 (10:50 IST)

जैशच्या 18 दहशतवाद्यांचा खात्मा: भारतीय सैन्याचा दावा

पाकिस्तान प्रशासित काश्मिरमधल्या नीलम व्हॅली आणि आणखी तीन ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून भारतीय सैन्य कारवाई करत असून, या कारवाईत आतापर्यंत 18 कट्टरतावाद्यांचा मृत्यू तसंच जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा भारतीय सैन्याने केला आहे.  
 
या कट्टरतावाद्यांबरोबरच 16 पाकिस्तानी सैनिकांचाही मृत्यू झाल्याचं सैन्याने म्हटलं आहे.
 
जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करणं तसंच त्या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी तिथे तोफगोळ्यांचा मारा चालू असल्याचं भारतीय सैन्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
 
पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचा भंग केल्यामुळे भारत ही कारवाई करत असल्याचंही सैन्याने स्षष्ट केलं आहे.