शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जून 2019 (11:00 IST)

केतकी चितळेला अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करा- मुख्यमंत्री

अभिनेत्री केतकी चितळेला सोशल मीडियावर खोट्या अकाउंटचा वापर करून अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
 
या प्रकरणी ट्रोलर्सवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष विजय औटी यांची भेट घेतली. गोऱ्हे यांनी ट्वीट करून या भेटीची माहिती दिली.
सोशल मीडियावर डमी आणि खोट्या अकाउंटवरून अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना अटक करून कडक कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित पोलीस उपायुक्तांना दिली आहे.