बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 4 सप्टेंबर 2019 (10:11 IST)

कृष्णेच्या पाण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सरकार एकत्र

कृष्णा खोरेल्या पाण्याचे संबंधित चार राज्यांना समान वाटप करावे, या आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या भूमिकेला एकत्रितपणे विरोध करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांच्या बैठकीत घेण्यात आला.
 
कृष्णा खोऱ्यातील पाण्याचं वाटप पूर्वीपासून महाराष्ट्र, कर्नाटक आणि पूर्वीचा संयुक्त आंध्र प्रदेश या राज्यांना होतं. आता या पाण्याचे समान वाटप चार राज्यांमध्ये करण्यात यावं, अशी भूमिका घेत आंध्र प्रदेश आणि तेलंगणाने तशी याचिका कृष्णा खोरे पाणी लवादाकडे केली आहे.
 
मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेतल्यावर सिद्धरामय्या आणि फडणवीस यांच्यात बैठक झाली. तेव्हा कृष्णा खोऱ्यातील पाण्यासह धरणांच्या पाण्याच्या नियोजनाबाबत एकत्रितपणे काम करण्याची भूमिका दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली.