शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जून 2022 (13:42 IST)

एकनाथ शिंदे: 'माझा एकनाथ तुझ्यात, तुझा एकनाथ माझ्यात' नाराजी नाट्यावरून मीम्सचा महापूर

memes on eknath shinde
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह सुरतला पोहोचले हे कळल्यानंतर सोशस मीडियावर मीम्सना उधाण आलं आहे.
 
एका मीमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिसतात. महाविकास आघाडीचं सरकार पडलं तर सत्तास्थापनेसाठी हालचाली वेगवान होऊ शकतात. ते आपल्या कर्मचाऱ्यांना सांगतात, "2 लिटर दूध जास्त सांगा आणि किराण्यात 2 किलो चहा पावडर आणि 5 किलो साखर वाढवा."
 
'झपाटलेला' चित्रपटाचं मराठी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान आहे. या चित्रपटातील बाहुला कमालीचा लोकप्रिय झाला होता. या बाहुल्याचा वापर करून भन्नाट असं मीम तयार करण्यात आलं आहे. "माझा एकनाथ तुझ्यात, तुझा एकनाथ माझ्यात, ओम फट स्वाहा..." असं लिहिलेलं मीम झपाट्याने व्हायरल होतंय.
 
अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सकाळचा शपथविधी करून दणका उडवून दिला होता. या सकाळच्या शपथविधीचा संदर्भ देऊन आणखी एक मीम प्रकटलं आहे. या मीममध्ये ते म्हणताना दिसतात, "काय करायचं ते ते दिवसा करा, जागरणे सोसवत नाहीत आता."
memes on koshyari
राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेत महाविकास आघाडीला चीतपट करणारे देवेंद्र फडणवीस मीमकर्त्यांच्या आवडीचे आहेत. "आग ऐसी लगायी मजा आ गया" असं म्हणणारे देवेंद्र यांचं मीम व्हायरल होतंय.
 
"साला साप को पाल रहा था" असं म्हणणारे मजेशीर मीम व्हायरल होतंय.
 
देवेंद्र फडणवीस यांना पुरणपोळ्या आवडतात असं एका कार्यक्रमात स्पष्ट झालं होतं. पुष्पा समजके फ्लॉवर नही फायर या धर्तीवर "पुरणपोळी खानेवाला समजा है क्या.... पुरुन उरने वाला है", असा खणखणीत टोला मीमकर्त्यांनी लगावला आहे.
memes on fadanvis
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गाडीतून जाताना "जगू द्या रे" म्हणणारं मीम खोचक आहे.
memes on uddhav
एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन सुरत जात आहेत असं दृश्य पाहणारे संजय राऊत क्रिशमधील हृतिक रोशनसारखे पाहत आहेत.
 
काही दिवसांपूर्वीच आनंद दिघे यांच्या कारकीर्दीवर आधारित धर्मवीर चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात एकनाथ शिंदेंची भूमिका होती. एकनाथ शिंदे आणि चित्रपटातील एकनाथ शिंदे यांचा एकत्र फोटो लोकप्रिय झाला होता. आता त्याच फोटोचं मीम झालं आहे. "हंगामी एकनाथ शिंदे म्हणून मी चालेल का?"
memes on shinde
"राज्यपाल कोश्यारी तातडीने झोपायला रवाना... उद्या पहाटे उठावे लागतंय बहुतेक" असं मीम व्हायरल होतंय.