गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (09:54 IST)

मुंबईचं पाणी 'एक नंबर', दिल्लीचं सगळ्यात खराब

देशात मुंबईच्या पाण्याची गुणवत्ता सगळ्यात चांगली आहे, तर याबाबत देशाची राजधानी दिल्ली तळाला असल्याचं केंद्र सरकारच्या एका रँकिंगमधून समोर आलं आहे.
 
देशातील 21 राज्यांच्या राजधानीतील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर आधारित ही रँकिंग केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री राम विलास पासवान यांनी जारी केली आहे.
 
या 21 शहरांच्या रँकिंगमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे.  
याविषयी माध्यमांना माहिती देताना पासवान म्हणाले, "या रँकिंगमधून आपल्याला कुणालाही दोष द्यायचा नाही. फक्त नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावं हा हेतू आहे. पिण्याच्या पाण्याबाबत देशभरातून तक्रारी येत होत्या. दिल्लीतील पाणी पिण्यालायक नसल्याचं तपासात समोर आलं."