चार वर्षांमध्ये 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या
महाराष्ट्रात 2015-2018 या चार वर्षांच्या कालावधीमध्ये 12 हजार 21 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री सुभाष देशमुख यांनी एका लेखी उत्तरात दिली आहे.
यापैकी 6888 प्रकरणं जिल्हास्तरीय समित्यांमध्ये पात्र ठरली आहेत. त्यातील 6845 प्रकरणांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या वारसांना एक लाख रुपयांची मदत देण्यात आल्याचेही या उत्तरात म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या कीडबाधित क्षेत्र अहवालात महाराष्ट्राचा समावेश असल्याची माहिती कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी एका लेखी वृत्तात दिली. महाराष्ट्रात ऊस, मका आणि ज्वारी यांच्यावर कीड पडली असून मक्यावर नव्या लष्कर अळीचा प्रादुर्भाव आढळल्याचेही त्यांनी सांगितले.