मी पक्षाला सोडणार नाही, पक्षाला मला सोडायचं असेल तर त्यांनी निर्णय घ्यावा, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आता चेंडू पक्ष श्रेष्ठींच्या कोर्टात टोलावला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिवशी कार्यकर्त्यांना गोपीनाथगड येथे जमण्याचे आवाहन केले होते. या कार्यक्रमाला जमलेले हजारो कार्यकर्ते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे,...