शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शनिवार, 7 डिसेंबर 2019 (11:07 IST)

प्रदूषणामुळं आयुष्य कमी होतं, असं कुठेच लिहिलेलं नाही: प्रकाश जावडेकर

प्रदूषणामुळं माणसांचं आयुष्य कमी होतं किंवा आरोग्यावर परिणाम होतो, असं कुठल्याही अभ्यासातून समोर आलं नाहीय, असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं.
 
प्रदूषणामुळं माणसांचं आयुष्य साडेचार वर्षांनी घटतं, असं काही संशोधनातून समोर आलंय. तर केंद्र सरकार यावर काय उपाययोजना करतंय? असा प्रश्न लोकसभा सभागृहात तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी विचारला.
 
त्यावर उत्तर देताना प्रकाश जावडेकर म्हणाले, "प्रदूषणावरून लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करू नये. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, या प्रयत्नांना अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतो आहे. शिवाय, प्रदूषण आणि आयुर्मान यांचा परस्परसंबंध असल्याचे कोणत्याही अभ्यासातून दिसून येत नाही."
 
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटना, लॅन्सेट सेंटर यांसारख्या संस्थांनी प्रदूषणामुळं देशात अनेक मृत्यू होत असल्याचं म्हटलं होतं. लान्सेटच्या अभ्यासानुसार, 2017 साली भारतात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक आठ जणांमधील एकाचा मृत्यू प्रदूषणामुळे झाला होता.