शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 28 मे 2019 (12:05 IST)

राम मंदिराचं काम लवकरच होणार - मोहन भागवत

राम मंदिराचं काम लवकरच होणार आहे,असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.  
 
लोकसभा निवडणुकीनंतर अहमदाबादमध्ये बोलताना त्यांनी म्हटलं की, "राम मंदिराचं निर्माण करायचं असेल, तर ते आपण स्वत:हून करणं गरजेचं आहे. ते दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर सोपवलं, तर त्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल. रामाचं मंदिर होणार आणि ते लवकरच होणार."
 
"आपण वाट पाहत असलेल्या गोष्टींविषयी काम करणं गरजेचं आहे. ते ध्येय साध्य करण्यासाठी आपण संबंधित संस्थांच्या कल्याणासाठी झटणं गरजेचं आहे," असंही त्यांनी म्हटलंय.