रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 11 एप्रिल 2019 (09:38 IST)

देशाच्या एकात्मतेसाठी मतदान करायला हवं - सरसंघचालक मोहन भागवत

आपल्या देशातील सर्व नागरिकांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असून, त्यांनी मतदान करायला हवं, राष्ट्राची सुरक्षा आणि एकात्मतेसाठी मतदान करायला हवं. निवडणूक आयोगही म्हणतं, आम्हीही तेच म्हणत आहोत असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूर येथे म्हटलं आहे. स्वर्गीय भाऊजी दफ्तर उच्च प्राथमिक शाळेच्या संघ बिल्डिंगमागील मतदान केंद्रात भागवत यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. 
 
आज संरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्वप्रथम मतदान केले असून, त्याकरीता ते सकाळीच मतदान केंद्रावर हजर झाले होते. येथील मतदान केंद्रावर मतदानाचा पहिला हक्कही त्यांनीच बजावला आहे. मतदान केल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना प्रत्येकाने मतदान करायला हवं, मतदान कराच असा संदेशही भागवत यांनी देशातील नागरिकांना दिला असून, राष्ट्राची सुरक्षा आणि एकात्मतेसाठी सर्वांनी मतदान करायलाच हवं. निवडणूक आयोगही सांगतं, आम्हीही तेच म्हणत असल्याचं भागवत यांनी म्हटलं आहे. आज देशातील पहिल्या टप्प्यातील मतदान होत असून सर्वत्र पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला   आहे.