मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 10 एप्रिल 2019 (18:13 IST)

इम्रान खानने पुलवामा हल्ल्याबाबत बोलावे : प्रकाश आंबेडकर

देशात काँग्रेस सरकार 100 टक्के येणार नाही याबाबत खात्री असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात निवडणुकीची मॅच फिक्सिंग आहे, असा आरोप भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. इम्रान खान याने पुलवामा हल्ल्याबाबतही बोलावे, त्यांच्याकडे काय माहिती आहे हे सांगावे अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. इम्रान खान यांनी मोदी सरकार 2019 मध्ये आल्यास दोन्ही देशात शांततेची बोलणी सुरु होईल आणि काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास या चर्चेला बाधा येईल, असं वक्तव्य केलं. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
 
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर यांच्या प्रचारासाठी उस्मानाबादमध्ये आले असता प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि काँग्रेसवर टीका केली. वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सर्व जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी संपूर्ण राज्यभर सभा घेत आहेत.