सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मार्च 2019 (17:03 IST)

दाऊद होता तयार मात्र शरद पवारांनी दुर्लक्ष केले - प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणुकीचा आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पूर्वीचे निर्णय आणि इतर गोष्टींवर पक्ष एकमेकांवर टीका करत आहेत. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनीशरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दाऊद भारतात येण्यास तयार होता, पवारांनी मध्ये खोडा घातला, असा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम स्वत: शरण येऊन समर्पण करणार होता. तसा प्रस्ताव त्याने ज्येष्ठ वकील राम जेठमलानींद्वारे दिला होता. मात्र या प्रस्तावाकडे शरद पवारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप, प्रकाश आंबेडकर यांनी केला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी हा आरोप केला आहे.
 
1993च्या मुंबई बॉम्बस्फोट व दंगलीचा मास्टर माइंड असल्याचा संशयित आरोपी दाऊद भारताला द्या, अशी भीक मागणाऱ्यांनी यापूर्वी आलेली संधी गमावलेली आहे. यापूर्वी ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी दाऊद समर्पण करायला तयार आहे आणि तो न्यायालयीन प्रक्रियेत देखील सहभागी होऊ इच्छितो, असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे अध्यक्ष व तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना दिला होता. परंतु शरद पवार यांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केलं. तसेच या निर्णयात यूपीए सरकारसुद्धा सहभागी आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.शरद पवार यांनी जेठमलानी यांची ऑफर का नाकारली याचा खुलासा करावा. हे सर्व मिलीभगतची सरकार आहे. मोदी हे शरद पवारांच्या घरी का जातात? मोदींना माहीत नाही का शरद पवार यांनी दाऊदला सरेंडर करून घेतलं नाही? असे प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले. यावर शरद पवार काय उत्तर देतात हे लवकरच कळेल.