बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020 (09:27 IST)

दिल्लीत 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

दिल्लीत चाणक्यपुरीत पाच वर्षांच्या मुलीवर 25 वर्षांच्या तरुणानं बलात्कार केल्याची घटना घडलीय. परदेशी दूतावासात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत ही घटना घडलीय. 
 
जखमी अवस्थेत घरी परतलेल्या चिमुकलीनं पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित चिमुकलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्याच दिवशी पोलिसांनी परदेशी दूतावासाच्या कर्मचारी वसाहतीतून आरोपीला अटक केली.
 
पाच वर्षांची पीडित चिमुकली घडलेली घटना घरी सांगणार नाही, अशा आशा आरोपीला होती, असं पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं.
 
या घटनेतील आरोपी परदेशी दूतावासात ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याचे वडीलही दूतावासातील सपोर्ट स्टाफमध्ये काम करतात. पीडित चिमुकलीही या वसाहतीत राहत होती. तिचे पालक सुद्धा सपोर्ट स्टाफमध्ये काम करतात.
 
दरम्यान, आरोपीवर पोक्सोअंतर्गत चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.