बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 18 डिसेंबर 2019 (10:29 IST)

शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा मोह आवरला नाही- शहा

शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा मोह निवडणूक निकालानंतर झाला, शरद पवार यांनी त्यांच्यापुढे मुख्यमंत्रिपदाचे दाणे टाकले ते शिवसेनेने टिपले अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. आमचा सत्तेतला भागीदार विरोधकांसोबत पळून गेला, त्यामुळे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकलो नाही असंही त्यांनी सांगितलं.  
 
महाराष्ट्रात आम्ही अजित पवारांना घेऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला त्यात यश आलं नाही. मात्र महाराष्ट्रात आम्ही अपयशी झालो असं मला मुळीच वाटत नाही. शिवसेनेसोबत मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचं ठरलं नव्हतं. आम्ही प्रत्येक सभेत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं सांगितलं होतं. मात्र शिवसेनेनं तेव्हा ही अट सांगितली नाही. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेनं वेगळा निर्णय का घेतला? आता आम्ही ज्या साथीदारावर विश्वास ठेवला तोच विरोधकांसोबत पळून गेला तर काय करणार? मात्र महाराष्ट्रात जे घडलं त्याला मी अपयश मानत नाही असंही त्यांनी सांगितलं.