1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 (08:49 IST)

अदानी-हिंडनबर्ग प्रकरणी वार्तांकनाबद्दल माध्यमांना सूचना देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

suprime court
हिंडनबर्ग अहवाल आणि अदानी समूह यासंदर्भात माध्यमांमध्ये होणाऱ्या वार्तांकनावर मर्यादा घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याचं द हिंदूने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
 
“आम्ही यासंदर्भात कधीही अशा प्रकारचे निर्देश माध्यमांना देणार नाही. आम्ही लवकरच या प्रकरणाचा निकाल जाहीर करू”, अशी भूमिका सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मांडली.
 
हिंडनबर्ग रिसर्चकडून प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालाच्या विरोधात अदानी उद्योग समूहाची बाजू मांडणाऱ्या चार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यावर एकत्रित सुनावणी घेण्यात आली असून त्यावर अद्याप निकाल जाहीर करण्यात आलेला नाही.
 
याच याचिकांसोबत एम. एल. शर्मा यांनी हिंडेनबर्ग अहवालाबाबत माध्यमांमधून होणाऱ्या वार्तांकनाबाबत एक मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयानं ही मागणी फेटाळली आहे.
Published By -Smita Joshi