सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जुलै 2021 (09:44 IST)

कोरोनाचा सर्वाधिक फटका गरीब महिलांना बसल्याचं अभ्यासातून उघड

कोरोना संसर्गाच्या जागतिक साथीचा सर्वाधिक फटका गरीब महिलांना बसला असून त्यांची नोकरी गमवण्यासोबतच त्यांचं जेवणही तुलनेने कमी झाल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय.
 
डॅल्बर्ग कन्सलटिंग फर्मने गेल्या वर्षी मार्च ते ऑक्टोबरदरम्यान केलेल्या संशोधनातून हे उघड झालंय.
 
यासाठी देशातल्या 10 राज्यातल्या कमी उत्पन्न गटातल्या 15,000 महिला आणि 2,300 पुरुषांची मतं जाणून घेण्यात आली.
 
भटक्या जमाती,मुस्लिम समाजातल्या महिला, विभक्त आणि घटस्फोटित महिलांना या जागतिक साथीचा मोठा फटका बसलाय.