मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019 (11:04 IST)

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी एचडीआयएलच्या दोन संचालकांना अटक

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी एचडीआयएलच्या दोन संचालकांना अटक करण्यात आली असून त्यांची 3500 कोटींची संपत्ती आणि दहा खाती गोठविण्यात आली आहेत.  
 
पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणारे एडीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक राकेश वाधवान आणि त्यांचे चिरंजीव सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अट केली आहे.
 
पीएमसी बँकेचं कर्ज घेऊन बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल आणि वाधवा यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
 
दरम्यान, गृहनिर्माण क्षेत्रातील 'एचडीआयएल' समूहाशी निगडित कर्ज घोटाळ्यामुळे र्निबध आलेल्या 'पीएमसी बँके'च्या ठेवीदारांना खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादेत रिझव्‍‌र्ह बँकेने आणखी वाढ केली असून ती आता 10 हजारांवरून 25,000 रुपये करण्यात आली असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.