साहित्य : 900 ग्रॅम चिकन कॅककॅस, 5 कप पाणी, 1 लहान कांदा उभा चिरलेला, 1 लहान गाजर चकत्या केलेले, 1 काडी सेलरी तुकडे केलेली, 1 छोटा चमचा मीठ, 1/4 छोटा चमचा मिरे पूड, दीड चमचा तेल.
कृती : कुकरमध्ये तेल सोडून बाकी सर्व पदार्थ घाला. उकळी येऊ द्या. वर येणारा फेस काढून टाका. तेल घाला. कुकर बंद करून 15 मिनिटे शिजवा. कुकर थंडझाल्यावर बारीक जाळीच्या गाळणीतून स्टॉक गाळून घ्या.