कृती : प्रथम बिस्किटांची पावडर करावी. दुधात अर्धी साखर व ड्रिंकिंग चॉकलेट घालून ही पावडर भिजवावी. नंतर लोणी फेसून त्यात उरलेली साखर व किसलेले खोबरे घालावे. नंतर भिजवलेल्या बिस्किटाच्या पिठाचे व खोबऱ्याच्या सारणाचे सारखे भाग करावे. पोळपाटावर प्लॅस्टिकच्या कागदांवर पिठाची पोळी लाटावी व त्यावर सारण पसरावे. नंतर या पोळीची घट्ट गुंडाळी करून एक तास फ्रीजमध्ये ठेवावी. नंतर वड्या पाडाव्यात. दोन रंगातील या वड्या चांगल्या लागतात. या वड्या फ्रीजमध्येच ठेवाव्यात.