कृती : दूध उकळून घ्यावे व अर्ध्या दुधात लिंबाचा रस किंवा दही घालून त्याचे पनीर तयार करावे. बाकी उरलेल्या दुधाला रबडी सारखे घट्ट करावे. पनीराला कुस्करून रबडीत घालून, साखर टाकावी. थंड करून सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यावे व त्यात पिस्ता, बदाम, वेलची पूड आणि आँब्याचे लहान लहान तुकडे कापून टाकावे. फ्रीजमध्ये थंड करून सर्व्ह करावे.