मंगळवार, 6 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By वेबदुनिया|

मश्रुमी पुलाव

मश्रुमी पुलाव पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 1/2 किलो तांदूळ, 250 ग्रॅम मश्रुम बारीक कापलेले, 2 कांदे बारीक चिरलेले, 1/2 चमचा लसणाची पेस्ट, 1/2 वाटी बारीक चिरलेला कोथिंबीर व कांद्याची जुडी, 5 -7 काळे मिरे, 1 चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार.

कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावे. एका भांड्यात कांदे-लसण व तिखट घालावे. नंतर मश्रुम टाकून चांगले परतावे व तांदूळ, मीठ, काळे मिरे टाकावे. तांदुळाच्या दुप्पट पाणी घालून भात शिजवावा. भात चांगला शिजल्यावर वरून कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करावा.