सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: सोमवार, 14 जून 2021 (19:37 IST)

अलमोडा एक नयनरम्य हिल स्टेशन

हिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात. भारतामध्ये डोंगरांच्या मोठ्या ,लांब, सुंदर आणि आश्चर्यकारक श्रेण्या आहे.एका बाजूस विंध्याचल,सातपुडाचे डोंगर,तर दुसऱ्या बाजूस अरावलीचे डोंगर. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत, भारतामध्ये एका पेक्षा एक उत्तम पर्वत, पर्वतश्रेणी आणि सुंदर व मोहक खोऱ्या आहेत.या वेळी आपण भारतातील शीर्षच्या हिल स्टेशन अलमोडा बद्दल माहिती घेऊ या .इथे फिरायला जाण्यापूर्वी उत्तराखंड राज्याच्या कोरोना मार्गदर्शकाची माहिती मिळवून मगच जावे. 
 
अलमोडा हिल स्टेशन- 
 
1 भारताच्या उत्तराखंड राज्यातील अलमोडा एक अतिशय सुंदर शहर आहे. याच्या पूर्वेला पिथौरागड व चंपावत,पश्चिमेस पौडी, उत्तरेस बागेश्वर, दक्षिणेस नैनीताल आहे.
 
2 अलमोडा येथे बरीच मंदिरे आहेत.दुनागिरी मंदिर, कासारदेवी मंदिर, चितई गोलू मंदिर, नंदा देवी मंदिर, कटारमल सूर्य मंदिर, जागेश्वर धाम मंदिर इत्यादींसारखी बरीच सुंदर आणि चैतन्य मंदिरे आहेत. येथे ब्रिटीश काळातील बॉडेन मेमोरियल मेथोडिस्ट चर्च देखील आहे.
 
3 अलमोडा येथे फिरण्यासारखे जिरो पॉईंट खूपच अद्भुत आहे जे बिनसर अभयारण्यात खूप उंचीवर आहे. इथून आकाश पाहणे खूपच चित्त थरारक होईल, तसेच येथून केदारनाथ आणि नंदा देवीची शिखर बघणे देखील आपल्याला आश्चर्य आणि रोमंचाने भरलेले वाटेल.येथून दिसणाऱ्या हिमालय खोऱ्याचे मनमोहक दृश्य आपल्याला स्वर्गाची अनुभूती देतील.
 
4 जलना,अल्मोडापासून 30 कि.मी. अंतरावर, एक लहान डोंगराळ गाव आहे जिथून आपण निसर्गाचे आणि एकांताचे अनुभव घेऊ  शकता. येथे 480 हून अधिक पक्षी प्रजाती आहेत, विस्तृत प्रकारची श्रेणी आणि फुलपाखरू संग्रहात भरलेले वन आहे.
 
5 अल्मोडापासून 3 कि.मी. अंतरावर असलेले, ब्राइट एंड कॉर्नर पॉईंट सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या  चित्तथरारक दृश्याने मोहित करणारे आहे. हा एक खास केंद्र बिंदू आहे येथून हिमालयातील खोऱ्यांमध्ये त्रिशुळ,नंदादेवी ,नंदकोट,पंचाचूली बघता येतील.
 
6 अल्मोडा कुमाऊं पर्वत रांगेत आहे आणि माउंटन बाइकिंगसाठी भारतातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. आणि जर रिव्हर राफ्टिंगचा आनंद घ्यायचा असेल तर काली शारदा नदीला भेट द्यावी लागेल.
 
7 अल्मोडा येथील बिनसर अभयारण्य देखील रोमांचकारी आहे. बिनसार पर्यटन स्थळ अल्मोडा हिल स्टेशनपासून  33 कि.मी.अंतरावर वसलेले एक छोटेसे गाव आहे. जी देवदार झाडांच्या घनदाट हिरवेगार जंगल,गवताचे मैदान आणि  सुंदर मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे.
 
8 अलमोडा चे हरीण पार्क अलमोडा पासून 3 किमी अंतरावर आहे.डियर पार्क ,निसर्ग आणि वन्यजीव प्रेमींसाठी एक उत्कृष्ट गंतव्य स्थान आहे.हरीण पार्कचे सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे हिरवेगार देवदार वृक्ष आणि त्यामध्ये फिरणारे हरीण, बिबट्या आणि काळे अस्वल सारखे प्राणी आणि त्यांचे सौंदर्य बघण्यासारखे आहे.
 
9 भारतातील काही उत्तम हस्तकला आणि सजावटीच्या वस्तू संग्रहित करण्यासाठी अल्मोडा प्रसिद्ध आहे. द्वाराहाट, रानीखेत, चौखुटिया आणि शीतलाखेत सारखी  बरीच सुंदर ठिकाणे येथे आहेत.
 
10 कौसानी नावाचे एक हिल स्टेशन अल्मोडापासून 53 कि.मी. उत्तरे कडे  वसलेले आहे. येथे देवदाराची घन दाट वने आहेत, ह्याच्या एका बाजूला सोमेश्वर खोरे व दुसर्‍या बाजूला गरुड व बैजनाथ खोरे आहेत.
 
11 अलमोडाला कोणत्याही मोसमात भेट देऊ शकता परंतु शांत वातावरण असल्यामुळे मार्च ते एप्रिल हा सर्वात चांगला काळ आहे. पंतनगर सर्वात जवळचे विमानतळ आहे जिथून अलमोडा 120 किमी अंतरावर आहे, काठगोदाम रेल्वे स्टेशन 80 किमी अंतरावर आहे. अलमोडा  हे हरिद्वार, नैनीताल, देहरादून आणि लखनऊच्या रस्त्याने जोडले गेले आहेत.