मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (16:07 IST)

मंदिरांचं शहर : वाराणसी

वाराणसी हे उत्तरप्रदेशातलं एक शहर. वाराणसीला धार्मिक महत्त्व आहे. काशी विश्वेश्वरासह बरीच मंदिरं वाराणसीमध्ये आहेत. इथली गंगा आरती खूप प्रसिद्ध आहे. गंगा घाटावर गंगा नदीची आरती केली जाते. ही आरती बघण्यासाठी तसंच यात सहभागी होण्यासाठी पर्यटक, भाविक या ठिकाणी येतात. वाराणसी बनारस आणि काशी या नावांनीही ओळखलं जातं. वरुणा आणि असी या दोन नद्यांमुळे या शहराला वाराणसी हे नाव पडलं.
वाराणसी उत्तरप्रदेशमधलं प्रमुख शहर आहे. मकर संक्रांत आणि वसंत पंचमीला वाराणसीमध्ये भाविकांची गर्दी झालेली असते. महाशिवरात्रीचा उत्सवही इथे मोठ्या उत्साहात साजरा होतो. महाशिवरात्रीला काशी विश्वेश्वराच्या मंदिरात भाविकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं. वाराणसीची लोकसंख्या बारा लाखांच्या घरात आहे. भारतीयच नाही तर परदेशी पर्यटकही वाराणसीला जातात. इथे खाण्यापिण्याचीही चंगळ असते. कचोरी सब्जी,चुरा मटर, बनारसी पान, लस्सी, विविध प्रकारच्या मिठाया, समोसे चाखता येतात. वाराणसीमध्ये अनेक देवी-देवतांची मंदिरं असल्यामुळे याला मंदिरांचं शहर म्हणता येईल.
 
नेहा जोशी