suvichar
✕

सफर मनोहारी कोला बीचची

Updated: मंगळवार, 9 मार्च 2021 (14:48 IST)
कोलाची गणना गोव्यातल सुंदर आणि आकर्षक बीचमध्ये होते. विशेष म्हणजे इथे शांतता असते. तुम्हालाही गजबजाटापासून काही काळ लांब राहायचं असेल तर गोव्याला या आणि कोला बीचला भेट द्या. या बीचलगत महागडी रिसॉर्टस्‌ किंवा हॉटेल्स नाहीत मात्र तुमच्यासाठी तंबूची सोय होऊ शकते. साधं पण चविष्ट जेवण मिळू शकतं. कोला हा स्वच्छ आणि सुंदर बीच आहे. इथल्या निळ्याशार समुद्रात पोहण्याची हौस भागवता येईल. या बीचवर कयाकिंगची सुविधा आहे. कयाकिंगची गणना धाडसीखेळांमध्ये केली जाते. वेगळा अनुभव म्हणून कयाकिंग करता येईल. या बीचवर सूर्यास्ताचं मनोहारी दर्शन घडतं.

कोला हा गोव्यातला सर्वोत्तम बीच असल्याचं म्हटलं जातं. हा समुद्रकिनारा छोटेखानी टेकड्यांनी वेढलेला आहे. भरपूर झाडी असणार्‍या या टेकड्यांमुळे समुद्रकिनार्‍याच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. गोव्यातल्या विविध समुद्रकिनार्‍यांवरून सूर्यास्ताचं दर्शन घडत असलं तरी कोलाचा सूर्यास्त वेगळाच आहे. निसर्गरम्य वातावरणामुळे इथला सूर्यास्त खास ठरतो. या बीचवरची सोनेरी वाळू आपल्याला आकर्षित करते. या वाळूवर नुसतं बसून राहिलं तरी खूप छान वाटतं. पणजीहून कोला बीचला जायला दोन तास लागतात. या प्रवासादरम्यान वेगळाच निसर्ग तुम्हाला खुणावत असतो.

सुहास साळुंख

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

बिगबॉस' फेम अभिनेत्री अर्चना गौतमच्या कॅफेमध्ये चोरी

सिद्धार्थ-कियारा पुन्हा आई-बाबा होणार

जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

सर्व पहा

तनुश्री दत्ताचा खळबळजनक दावा; नाना पाटेकर जिवंत असल्याचा संशय व्यक्त, DNA चाचणीची मागणी चर्चेत

Sunny Deol Suryaa: सनी देओलच्या नव्या अवताराने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली

दिवाळीच्या सुट्टीत महाराष्ट्रातील किल्ले पाहायला जाणार? प्रवासापूर्वी ही माहिती घ्या

विराट-अनुष्काने मुंबईत खरेदी केले एकापाठोपाठ ३ फ्लॅट्स; किंमती ऐकून थक्क व्हाल!

प्रसिद्ध अभिनेते आर. जे. मिट्टे यांचे वयाच्या ३४ व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments