सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

बोध कथा : भांडखोर शेळ्या आणि लबाड लांडगा

बऱ्याच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात एखाद्या गोष्टींवरून दोन शेळींमध्ये जोराचं भांडण सुरू होत. त्यांच्या भांडणाला तिथून एक भिक्षुक जाताना बघत होते.  बघता-बघता त्या दोन्ही शेळींमधील होणारे भांडण विकोपाला गेले. 
त्यांना भांडताना बघून एक लबाड लांडगा तिथून निघाला.तो खूप भुकेला होता.त्यांनी त्या दोन्ही शेळींना आपसात भांडताना बघितल्यावर त्याच्या तोंडाला पाणी सुटले. 
त्या शेळीचे भांडण वाढत गेले की त्यांनी एकमेकांना जखमी करून रक्तबंबाळ केले. तरीही त्या भांडत होत्या.दोघींच्या शरीरातून रक्त निघत होते. भुकेल्या लबाड लांडग्याने जमिनीवर रक्त सांडलेले बघून ते चाटण्यास सुरू केले आणि त्या शेळीच्या मध्ये जाऊ लागला. त्याची भूक अधिक वाढली होती. त्या लबाड लांडग्याच्या मनात आले की मी या दोन्ही शेळ्यांना मारून खाऊन आपली भूक भागवेन.असा विचार करत तो त्या शेळींच्या मध्ये जाऊ लागला. 
लांबून ते भिक्षुक सर्व बघत होते त्यांना वाटले की जर हा लांडगा त्या शेळींच्या भांडण्याच्या मध्ये  गेला तर ह्याला देखील इजा होऊ शकते. कदाचित या लांडग्याचा जीव देखील जाऊ शकतो. 
भिक्षुक असा विचार करतच होते की तो लबाड लांडगा दोन्ही शेळ्यांच्या मध्ये जाऊन पोहोचला. त्या लांडग्याला आपल्या मध्ये आलेले बघून त्या दोन्ही शेळींनी भांडण सोडून त्याचा वर हल्ला केला. अचानक आपल्यावर झालेल्या या हल्ल्याला बघून लांडगा घाबरला आणि स्वतःला सांभाळू शकला नाही त्याला या मुळे दुखापत झाली. तो आपला जीव वाचवत तिथून पळाला. 
लांडग्याला पळून जाताना बघून शेळ्यांनी देखील भांडणे संपविले आणि आपापल्या घरी निघून गेल्या. भिक्षुक देखील आपल्या घरी निघून गेले. 
 
तात्पर्य - कधीही लोभ करू नये तसेच दुसऱ्यांच्या भांडण्यात कधी ही पडू नये, या मुळे आपलेच नुकसान होऊ शकतो.