शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (19:30 IST)

कहाणी अकबर बिरबल आणि जादूचा गाढव

एकेकाळी बादशहा अकबर ने आपल्या बेगमच्या वाढदिवसाला एक अतिशय सुंदर आणि मौल्यवान हार भेट म्हणून दिला. त्यांना तो हार खूप आवडला. त्यांनी हार घातला आणि रात्री तो एका पेटीत काढून सांभाळून  ठेवला. बरेच दिवस झाले. त्यांनी तो हार घातला नाही. एके दिवशी त्यांनी  तो हार  घालण्यासाठी पेटी उघडली तर काय त्यात हार नव्हते. त्यांनी सगळी कडे शोधले पण त्यांना काही तो हार सापडेना. शेवटी त्यांनी ही गोष्ट बादशहा अकबर ला सांगितली. त्याने आपल्या सैनिकांना हार शोधायला सांगितले पण कुठेच हार सापडेना. बादशहाला समजले की हार चोरीला गेला आहे.  
त्यांनी बिरबलाला दरबारात येण्यास सांगितले आणि हार चोरी गेल्याचे सांगितले. आता तो हार आपणचं शोधा असे ही म्हणाले. वेळ ना गमावता लगेच बिरबलाने राजमहालात काम करणाऱ्या सर्व सेवकांना दरबारात हजर होण्यास सांगितले. दरबारात ते सर्व कामगार आले परंतु बिरबलांचा कुठे ही पत्ता नव्हता. सर्व बिरबलाची वाट बघत होते. तेवढ्यात बिरबल आपल्या सह एक गाढव घेऊन आले आणि म्हणाले की हा माझा मित्र आहे आणि हा गाढव सामान्य नसून जादुई आहे. ह्याचा कडे जादूची अशी शक्ती आहे ज्यामुळे बेगमचा हार कोणी चोरला आहे ते कळेल.  
नंतर बिरबल त्या गाढवाला एका जवळच्या खोलीत जाऊन बांधून येतो आणि येऊन म्हणतो की आता सर्व कामगारांनी एक एक करून त्या खोलीत जावे आणि या गाढवाची शेपूट धरून जोराने ओरडावे की "बादशहा मी हार चोरी केला नाही. आणि हा आवाज या दरबार पर्यंत आला पाहिजे. सर्वानी असे केल्यावर तो गाढव स्वतःहून सांगेल की चोर कोण आहे. आणि हार कोणी चोरला आहे.  
सर्व कामगार एकएक करून त्या खोलीत जातात आणि गाढवाची शेपूट धरून जोरात ओरडतात "बादशहा मी चोरी केली नाही".
सर्व जाऊन आल्या वर बिरबल त्यांना त्यांचे दोन्ही हात पुढे करण्यास सांगतात आणि त्या हाताचा वास घेतात. वास घेत घेत ते एका सेवक जवळ येऊन  त्याचे हात धरून जोरात ओरडतात की बादशहा हुजूर "हाच आहे तो चोर. " बादशहा त्यांना म्हणतात ''बिरबल आपल्याला कसे समजले की हाच चोर आहे" एवढ्या विश्वासाने कसे सांगत आहात. "आपल्या त्या जादुई गाढवाने ह्याचे नाव सांगितले आहे. "
 
बिरबल म्हणाले की  बादशहा हा सामान्य गाढवच आहे हा काही जादुई गाढव नाही. मी त्याच्या शेपटीला सुवासिक द्रव्य लावले होते. ज्यांनी त्याचा शेपटीला धरले त्यांच्या हाताला तो सुवासिक वास येत होता. पण ह्याने शेपटीला धरलेच नाही म्हणून ह्याच्या हाताला तो वास येत नाही.  
अशा प्रकारे बिरबलाच्या चातुर्याने चोर आणि बेगम चा हार देखील सापडला. बिरबलाच्या चातुर्याचे सर्वानी कौतुक केले.  
 
शिकवण- या कथेमधून शिकवण मिळते की वाईट कामाला किती देखील लपविले तरी ते एकेदिवशी सर्वांच्या सामोरी येत. म्हणून कधीही वाईट काम करू नये.