अकबर बिरबल कथा : सर्वात गोंडस बाळ

Last Modified गुरूवार, 4 मार्च 2021 (19:20 IST)
एकदा बादशहा अकबर दरबारात आपल्या गोंडस बाळासह हजर झाले. दरबाऱ्यांत असलेल्या प्रत्येक लोकांची नजर त्या राजकुमारावर होती. प्रत्येक जण हे म्हणत होता की जगात एवढे सुंदर कोणीच नसणार. सर्वांचे म्हणणे ऐकून बादशहा देखील आनंदात होते. त्यांनी बिरबलाला विचारले की आपले या बाबत काय मत आहे.
बिरबल म्हणाले '' बादशहा राजकुमार सुंदर आहे गोंडस आहे पण माझ्या मते हे जगातील सर्वात गोंडस बाळ नाही.
या वर अकबर चिडले आणि विचारले की आपल्या मते आमचा बाळ गोंडस नाही. नाही बादशहा असे नाही, माझ्या म्हणायचा तात्पर्य असं काही नाही. राजकुमार गोंडस आहे परंतु या पेक्षा देखील अधिक गोंडस बाळ असतील हे मला म्हणायचे आहे. म्हणजे आमचे बाळ गोंडस नाही असं समजावं का आम्ही बादशहाने विचारले.
होय,बादशहा मला हेच म्हणायचे आहे. जर आपल्याला असे वाटते की या पेक्षा अधिक गोंडस बाळ आहे तर त्याला आमच्या समोर घेऊन या.बादशहा बिरबलाला म्हणाले.
अकबराच्या आदेशानुसार बिरबल गोंडस बाळ शोधायला बाहेर पडतात. काही दिवसानंतर ते एकटेच दरबारात येतात. त्यांना बघून बादशहा विचारतात की एकटेच आला कुठे आहे ते गोंडस बाळ. ?
बिरबल म्हणे बादशहा मी या पेक्षा अधिक गोंडस बाळ शोधले आहे आपल्याला माझ्यासह त्याचा घरी जावे लागेल मी त्याला इथे आणू शकत नाही. असं काय कारण आहे की आपण त्याला इथे आणू शकत नाही. हे तर आपल्याला माझ्या सह आल्यावरच कळेल. असं म्हणत अकबर आणि बिरबल दोघे ही मुलाला भेटायला वेष बदलून जातात.
बिरबल अकबराला एका झोपडी जवळ घेऊन जातात, तिथे गेल्यावर ते एका लहान बाळाला मातीत खेळतांना बघतात. बिरबल म्हणतात बघा बादशहा हुजूर जगातील सर्वात गोंडस बाळ .
त्याला बघून अकबराला राग येतो आणि ते बिरबलाला म्हणतात की आपण या घाणेरड्या बाळाची तुलना आमच्या राजकुमाराशी करत आहात.
अकबराचे मोठ्याने बोलणे ऐकून ते बाळ जोरात रडू लागते, त्याचे रडणे ऐकून त्याची आई घरातून बाहेर येते आणि रागावून म्हणते की आपण माझ्या गोंडस बाळाला घाणरेडे कसे म्हटले. मी दोघांना बदडून काढेन माझ्या सुंदर आणि गोंडस बाळाला कुरूप घाणेरडे म्हणायची हिम्मत कशी झाली .चला जा इथून नाही तर मी दोघांचे हातपाय मोडेन. असं म्हणत ती आपल्या बाळाला जवळ घेते आणि त्याचे लाड करते आणि म्हणते माझं गोंडस बाळ. बादशहा हे ऐकून गप्प होतात.
बिरबल त्यांना म्हणतात की बघा हुजूर आता सर्व कळले असणार की मी असं का म्हणत होतो. अकबर त्याच्या बोलण्याला मान्य करतात आणि म्हणतात की आपण खरे म्हणता की प्रत्येक आई-वडिलांसाठी त्यांचे मुलंच जगातील सर्वात गोंडस असतात.आपण हे पुन्हा सिद्ध केले. मी आपल्या मताशी सहमत आहे. आपण पुन्हा एकदा आमचे मन जिंकले.

तात्पर्य : कधीही कोणत्याच गोष्टीवर गर्व करू नये. गर्व कधी न कधी मोडला जातो.यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

पोस्ट कोविड टेस्ट, कोरोनातून बरे झाल्यानंतर कोणत्या टेस्ट ...

पोस्ट कोविड टेस्ट, कोरोनातून बरे झाल्यानंतर कोणत्या टेस्ट आवश्यक जाणून घ्या
कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण देशात थैमान मांडले आहे. या परिस्थितीत संपूर्ण ...

उपयोगी सोपे किचन टिप्स

उपयोगी सोपे किचन टिप्स
* चापिंग बोर्डवरील डाग काढण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा घाला त्यावर एक लिंबू पिळा आणि ...

ईद 2021 विशेष निबंध इस्लामिक आनंदाचा सण ईद

ईद 2021 विशेष निबंध इस्लामिक आनंदाचा सण ईद
इस्लामिक कॅलेंडरमध्ये दोनदा ईद साजरी केली जाते. ईद उल फितर आणि ईद उल अझा. इस्लाममध्ये ...

खाज होण्याची समस्या आहे, हे घरघुती उपचार अवलंबवा

खाज होण्याची समस्या आहे, हे घरघुती उपचार अवलंबवा
आपल्या शरीरावर कोणत्याही प्रतिक्रियेमुळे बर्‍याचदा खाज सुटणे सुरु होते. खाज वेगवेगळ्या ...

लवंगाच्या वापर सावधगिरीने करा अन्यथा नुकसान होऊ शकते.

लवंगाच्या वापर सावधगिरीने करा अन्यथा नुकसान होऊ शकते.
भारतीय पाककृतीमध्ये लवंगाला एक विशेष स्थान आहे. त्याचा उपयोग केल्याने चवीसह त्याचे काही ...