मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (14:28 IST)

सर्फिंगचा थरार अनुभवायचा असेल तर काही देसी पर्याय...

आपल्या भारतातही वॉटर स्पोर्टस्‌ बरंच लोकप्रिय होत आहे. स्कुबा डायव्हिंग, रिव्हर राफ्टींग, सर्फिंग, मोटर बोटची सफर असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. वॉटर स्पोर्टस्‌चा थरार वेगळाच असतो. तुम्हाला सर्फिंग करावंसं वाटत असेल तर भारतातल्या विविध समुद्रकिनार्यांभना भेटी देता येतील. सर्फिंगचे हे काही देसी पर्याय...
 
* वॉटर स्पोर्टस्‌चा भन्नाट अनुभव घेण्यासाठी पुड्डूचेरीला भेट द्या. इथले स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे तुम्हाला आकर्षित करतील. इथल्या समुद्रातल्या लाटांवर स्वार होऊन मस्तपैकी सर्फिंग करता येईल. इथला सेरेनिटी समुद्रकिनारा सर्फिंगसाठी प्रसिद्ध आहे.
तसंच अन्य आकर्षक समुद्रकिनारेही आहेत.
* केरळ हे भारतातल्या सुंदर राज्यांपैकी एक. केरळचा कोवलम समुद्रकिनारा खूप प्रसिद्ध आहे. इथेही सागराच्या उंच उंच लाटांवर स्वार होऊन सर्फिंगचा आनंद लुटता येईल.
* कर्नाटकमधल्या गोकर्णचा समुद्रकिनारा खास आहे. हा समुद्रकिनारा पर्यटकांचं खास आकर्षण ठरतो. हा समुद्रकिनाराही सर्फिंगसाठी उत्तम मानला जातो. इथे बरेच पर्यटक सर्फिंगसाठी येतात. इथल्या महाबळेश्वर मंदिराला भेट दिल्यानंतर लोक गोकर्णच्या समुद्रकिनार्यातवर येऊन सर्फिंगचा थरार अनुभवतात. तुम्हीही अशी एखादी सहल ठरवू शकता.
* गोवा हे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. देशाविदेशातले पर्यटक गोव्याला भेट देत असतात. इथले शांत आणि सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांचं मन मोहवून टाकतात. इथला निसर्ग प्रेमात पाडतो. गोव्यातही सर्फिंगची संधी मिळते. इथे बरेच सर्फिंग पॉईंट्‌स आहेत. इथल्या समुद्रकिनार्यांावर निवांत सर्फिंग करता येईल. यंदा पर्यटनाच्या काही वेगळ्या वाटा निवडून आनंद द्विगुणित करता येईल.