बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: शनिवार, 9 एप्रिल 2022 (22:21 IST)

Floating Bridge: भारतातील फ्लोटिंग ब्रिज या ठिकाणी आहे, जाणून घ्या वैशिष्टये

Florida Keys: Overseas Hywy & 7 Mile Bridge Aerial
बऱ्याच वेळा परदेशात पर्वतांवर बांधलेले पारदर्शक पूल, तरंगते पूल आदींची चित्रे पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र परदेशात केलेली ही भव्य बांधकामे अनेकांना प्रत्यक्ष पाहता येत नाहीत. कारण ते बजेटच्या बाहेरचे असतात. पण भारतात ही आता अशा प्रकारचे बांधकाम नुकतेच केरळ मध्ये कोझिकोड मध्ये बांधण्यात आले आहे. येथे बेपोट बीचवर फ्लोटिंग म्हणजे तरंगणारे पूल आहे. दिवसेंदिवस या पुलावर पर्यटकांची गर्दी होत आहे. हा पूल पाण्याच्या प्रवाहानुसार स्वत:ला जुळवून घेतो आणि पर्यटकांना लाटांची अनुभूती देतो. पर्यटकांना येथे जाण्याचा मोह आवरता येत नाही. केरळच्या कोझिकोड येथे हे बनलेले तरंगणारे पूल पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. आपण देखील या फ्लोटिंग पुलाला भेट देऊ इच्छित आहात तर या नवीन फ्लोटिंग पुलाचे वैशिष्टये जाणून घेऊ या. 
 
केरळमधील तरंगणारा पूल - 
केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील बेपोट बीचवर समुद्रावर पूल बांधण्यात आला आहे. समुद्रावरील पूल वाऱ्याच्या लाटांनी हालतो. पाण्याच्या लाटा पुढे सरकल्या की, पूल वाऱ्याबरोबर डोलायला लागतो. हा तरंगता पूल सुमारे 100 मीटर लांब आहे. या पुलावर जाण्यासाठी प्रवाशांना आधी लाईफ जॅकेट घालावे लागते. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना लाईफ जॅकेट घातल्यानंतरच त्यावर चढण्याची परवानगी दिली जाते.
 
पुलाची क्षमता -समुद्रावरील या तरंगत्या पुलाच्या क्षमतेबद्दल सांगायचे तर, या पुलावरून एकावेळी 500 लोक जाऊ शकतात. मात्र, सध्या लाइफ जॅकेट घालून केवळ 50 जणांनाच पुलावर जाण्याची परवानगी आहे.
 
तरंगत्या पुलावर कधी जाऊ शकता- जर आपल्याला ही  तरंगत्या पुलावर जायचे असेल तर आपण सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत कोणत्याही दिवशी जाऊ शकता. हे 15 मीटर रुंद असून, त्याभोवती फिरणाऱ्या पर्यटकांना ते पाण्यावर चालत असल्याचा भास होतो.
 
वैशिष्टये -हा पूल 100 मीटर लांब आहे, जो हाय डेन्सिटी पॉलीथिलीन (HDPE) ब्लॉकपासून बनवला गेला आहे. समुद्राच्या मध्यभागी बांधलेल्या या पुलासाठी 7 किलो वजनाचे 1300 एचडीपीई ब्लॉक्स वापरण्यात आले आहेत. या विटा पोकळ असून त्या पाण्यावर सहज तरंगू शकतात. त्यामुळे गरजेनुसार ते फिरवता येते. तीन मीटर रुंदीचा पूल शेवटी 15 मीटर रुंदीचा बनतो, जिथून समुद्राचे सर्वोत्तम दृश्य दिसते.