सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 5 एप्रिल 2022 (18:27 IST)

खास लॉंग ड्राईव्हसाठी बनवल्या आहेत या 3 सुंदर बाइक्स, जाणून घ्या वैशिष्टये

bike drive fine
आपण लांब ड्राइव्हसाठी दमदार बाईक शोधत असाल, तर आज आम्ही अशा तीन बाईक्स बद्दल सांगणार आहोत, ज्या 300 cc ते 350 cc या सेगमेंटमध्ये येतात. यामध्ये Royal Enfield's Classic 350, Jawa आणि Honda's H'Ness CB 350 यांचा समावेश आहे. आम्ही  या तिन्ही बाईकच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगणार आहोत.  चला तर मग जाणून घेऊ या .

1 रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 - या मध्ये 349 cc सिंगल सिलेंडर, 4-स्ट्रोक, एअर-कूल्ड DOHC इंजिन आहे जे 6100 rpm वर 20.2 bhp ची कमाल पॉवर आणि 4000 rpm वर 27 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. यात 13 लिटर क्षमतेची पेट्रोल टाकी आहे. त्याचे कर्ब वजन 195 किलो आहे. ही बाईक भारतीय बाजारात 5 ट्रिममध्ये येते. यामध्ये Redditch, Halcyon, Signals, Dark आणि Chrome यांचा समावेश आहे. चेन्नईच्या ड्युअल चॅनल ABS प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 2.18 लाख रुपये आहे.
 
2 होंडा  H'नेस CB 350 -या मध्ये 348 cc, सिंगल सिलेंडर, एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, OHC इंजिन आहे जे 5,500rpm वर 20.8bhp ची कमाल पॉवर आणि 3,000rpm वर 30Nm पीक टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. यात 15 लिटरची पेट्रोल टाकी आहे. त्याचे कर्ब वजन 181 किलो आहे. ही बाईक दोन व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये DLX आणि DLX Pro यांचा समावेश आहे. त्याची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 1.98 लाख रुपये आहे, जी 2.06 लाख रुपयांपर्यंत जाते.
 
3 जावा -या मध्ये  293 cc लिक्विड कूल्ड, सिंगल सिलेंडर, 4-स्ट्रोक, DOHC, BS6 इंजिन देण्यात आले आहे, जे 36.51 PS ची कमाल पॉवर आणि 28Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. यात 14 लीटरची इंधन टाकी आहे. त्याचे कर्ब वजन 172 किलो आहे. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.78 लाख रुपये आहे, जी 1.87 लाख रुपयांपर्यंत जाते.