शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: रविवार, 4 जुलै 2021 (15:26 IST)

ट्रेकिंग प्रेमींसाठी ही 5 ठिकाणे स्वर्गापेक्षा कमी नाहीत,जाणून घ्या

ट्रेकिंग करणे प्रत्येकासाठी शक्य नसते, कारण त्यात जंगलांमधून चालणे, पर्वत चढणे,नद्या पार करणे इत्यादींचा समावेश आहे.जरी आपण ट्रेकर नसाल तरी आपण आपल्या मित्रांसह या ठिकाणी जाण्याची योजना आखली पाहिजे.भारतातील ही पाच ठिकाणे अशी आहेत की जिथे एकदा तरी ट्रेकिंग केलीच पाहिजे.
 
1 रूपकुंड ट्रेक, उत्तराखंड- हा ट्रेक कमकुवत मनाच्या लोकांसाठी नाही. एका आठवड्यापेक्षा जास्त ट्रेकिंग केल्यावर,रूपकुंडचा प्रसिद्ध रहस्यमय तलाव बघायला मिळतो. येथे ट्रेकिंगसाठी उत्तम काळ म्हणजे मे ते ऑक्टोबर.चा आहे.
 
2 चंद्रताल लेक ट्रेक,हिमाचल प्रदेश-स्पीती येथे एक किलोमीटर लांबीचे तलाव सुमारे 4300 मीटर उंचीवर आहे. जर आपण हँपटा पासच्या दिशेने जात असाल तर आपण या सुंदर तलावासाठी ट्रेकिंग करू शकता.
 
3 ज़ोंगरी ट्रेक,वेस्ट सिक्कीम-कमी वेळात अधिक एक्सप्लोर करू इच्छिणार्‍या ट्रेकर्ससाठी हा शॉर्ट ट्रेक एक उत्तम पर्याय आहे. या ट्रेकमधून कांचनजंगा डोंगराची काही सुंदर दृश्येही बघायला  मिळतील. येथे ट्रेकिंगसाठी उत्तम वेळ म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबर किंवा मार्च ते एप्रिल दरम्यान आहे.
 
 
4 व्हॅली ऑफ फ्लावर्स ट्रेक, उत्तराखंड- राज्यात सर्वात सुंदर ट्रेकंपैकी एक आहे जिथे आपल्याला झिनियस, पेटुनियास आणि पॉपीज सारख्या विविध प्रकारचे रानटी फुले आढळतात.या ठिकाणी भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे जून ते सप्टेंबर दरम्यान आहे. 
 
5 चादर ट्रेक, लडाख- तुम्ही कधी गोठलेल्या नदीवर चालला आहे? तसे नसेल तर लडाखच्या ज़ंस्कार व्हॅलीमध्ये वसलेल्या ज़ंस्कार नदीचा आनंद नक्कीच घ्या.हे एक आव्हानात्मक ट्रेक आहे, जे अत्यंत कमी तापमानासह 105 कि.मी.पर्यंत पसरलेले आहे.जर आपणास गोठलेली नदी बघायची असेल तर आपण जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये जाऊ शकता.