शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : बुधवार, 21 जुलै 2021 (17:39 IST)

गोवा जाण्याचा प्लान करत असाल तर नक्की वाचा, पर्यटकांसाठी गाइडलाइंस जारी

प्रत्येकाला गोव्यात जाण्याची इच्छा असते. काही लोक तर असे असतात जे पुन्हा पुन्हा गोव्याला भेटण्यास तयार असतात. परंतु कोरोना कालावधीत लोकांना येथे जाण्याची परवानगी नव्हती. मात्र, आता गोव्यासाठी नवीन गाइडलाइंस आली आहेत. गाइडलाइंसप्रमाणे निगेटिव कोरोना टेस्टशिवाय गोवा प्रवासास परवानगी नाही.
 
तथापि, जे कार्यालयीन काम करतात किंवा गोव्यातील रहिवासी आहेत आणि कोरोना लसचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना कोरोना चाचणी अहवाल दर्शविण्याची आवश्यकता नाही.
यापूर्वी म्हणजेच 2 जुलै रोजी गोव्यात सर्व पूर्णपणे लसीकरांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयानंतर गोव्याच्या पर्यटनस्थळांवर लोकांची मोठी गर्दी उसळली.