गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By वेबदुनिया|

राजवाड्यांचे शहर : कोलकाता

सांस्कृतिक क्षेत्राची भारताची राजधानी मानल्या जाणारे कोलकाता हे शहर निसर्ग पर्यावरणाशी सलोख्याचे असे शहर आहे. हे शहर ब्रिटिशकालीन राजशाही शिल्पकलेचेच नमुने त्याचबरोबर जगातील सर्वात जास्त संख्येत असलेले कवी, लेखक, कलाकार या सर्वांचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे.

पूर्वेकडील भौगोलिक खंडात पाश्चिमात्य राजेशाहीच्या राजधानीचे दार्शनिक रुप असलेले हे शहर भविष्यात स्वत:च्या साम्राज्याचे स्वप्न पाहणार्‍यांचे वंशज व 18-19व्या शतकात अफगाण, बर्मा, चीन, डेन्स, डच, इंग्रजी, फ्लेम, फ्रांस, ग्रीक, आयलंड, ज्यू, बगदाद, काबुल, पोर्तुगाल, स्कॉट, स्विडन अशा जगभरातून कोलकाता शहरात शहराच्या भरभराटीच्या काळात शरणार्थी म्हणून आलेले लोक या सर्वांमुळे ‍विविध संस्कृतींचे माहेर घर किंवा वैश्विक शहर म्हणवले जाते.

इतर शहराला भेटी देऊन आलेले व तिथल्या भेटीने स्तंभित झालेले पर्यटक जेव्हा कोलकात्याचे दर्शन घेतात तेव्हा त्यांना जाणवते, की हे शहर स्वत:च्या सौंदर्याचे मंत्र स्वतन करीत आहे, ज्या शहराचे रहिवासी कलेच्या एका उच्च वर्गाचे ऐश्वर्य धारण करून आहेत. हे शहर आहे कलांच्या विविध दालनांचे, संगीत समारंभाचे, सिनेगृह, पुस्तकांच्या व चित्रांच्या मेळाव्यांचे. आशियातील हे शहर इथे भेटीस येणार्‍या पर्यटकांसमोर इतिहासाच्या वरच्या पायरीपासून चालत चालत खाली येते व त्यांना जुने राजप्रसाद, मंदिरे, थडगे, चर्च, राजकला यांचे दर्शन घडवते. इथे जास्त काळ थांबणार्‍या पर्यटकाला या शहराला परत परत भेट देण्याची लालसा किंवा नशाच चढून जातो.