कोलकाता : देशातील पहिला पाण्यावर तरंगणारा बाजार
देशातील पहिला पाण्यावर तरंगणाऱ्या बाजार कोलकातामध्ये बनविण्यात आला आहे. दक्षिण कोलकातामधल्या पाटुली परिसरातील तलावावर हा बाजार आहे. थायलंडमधील फ्लोटिंग मार्केटच्या संकल्पनेवर आधारित या बाजाराची निर्मिती करण्यात आली आहे.
सुमारे २४ हजार चौरस मीटर जागेवरील या बाजाराच्या निर्मितीचा खर्च सुमारे नऊ कोटी रुपये इतका आला आहे. या तरंगत्या बाजारात १०० हून अधिक बोटी आहेत. या बोटींवर फळं, भाज्या, धान्य यांसोबतच मांस आणि मासे यांचीही विक्री करण्यात येत आहे. फ्लोटिंग मार्केटची संकल्पना थायलंड आणि सिंगापूर या शहरांमध्येही आहे. कोलकातामधील हे फ्लोटिंग मार्केट सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहील.