शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 मे 2021 (22:35 IST)

माउंट आबू हिल स्टेशन

हिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात. भारतामध्ये डोंगरांच्या मोठ्या,लांब,सुंदर आणि आश्चर्यकारक श्रेण्या आहे.एका बाजूस विंध्याचल,सातपुडाचे डोंगर,तर दुसऱ्या बाजूस अरावलीचे डोंगर.काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत, भारतामध्ये एका पेक्षा एक उत्तम पर्वत, पर्वतश्रेणी आणि सुंदर व मोहक खोऱ्या आहेत.उन्हाळ्यात येथे चालणे खूपच मोहक आहे.आपण हनिमून चा विचार करीत असाल तर आपल्यासाठी माउंट आबू जाणे श्रेष्ठ राहील. चला माहिती जाणून घ्या. 
 
माउंट आबू (राजस्थान):
 
1 माउंट अबू राजस्थान मधील अरावली डोंगरावर वसलेले एक अनन्य ठिकाण आहे. येथे एकीकडे नैसर्गिक सौंदर्य आहे तर 
दुसरीकडे आध्यात्मिक शांती आहे.
 
2 पौराणिक कथेनुसार, याच ठिकाणी महान ऋषी वशिष्ठ राहत होते.हे ऋषीमुनींचे निवास स्थान मानले जाते. 
 
3 माउंट आबू मध्ये अरण्य बघण्या व्यतिरिक्त गुरू शिखर, रघुनाथ मंदिर, गोमुख मंदिर,अधर देवी मंदिर, दिलवाड़ा जैन मंदिर, सनसेट पॉईंट, ब्रह्मा कुमारी शांती पार्क, हनीमून पॉईंट, येथे घनदाट अरण्य असलेले ट्रॅव्होर्स टॅंक ही स्थळे बघण्याजोगती आहे.
 
4 रेल्वेमार्गाने माउंट आबू जवळ आबू स्थानकावर पर्यटक पोहोचू शकतात.जयपूर, उदयपूर, दिल्ली,अजमेर येथून जाणा्या बसेस थेट पर्यटकांना माउंट आबू कडे घेऊन जातात. माउंट आबू रस्त्याने जोडलेले आहे. हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 आणि 14 जवळ आहे. एक छोटा रस्ता शहराला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 शी जोडतो. जर आपण दिल्लीत असाल तर दिल्लीतील काश्मिरी गेट बस स्टँड येथून माउंट आबूसाठी थेट बस सेवा आहे.